विद्यार्थ्याच्या धाडसामुळे चोरीचा बेत फसला
भुईंज, दि. 11 (प्रतिनिधी) - एका वृध्देच्या हातातील 30 हजार रुपये असलेली पिशवी पळवून नेणार्या चोरट्याचा पाठलाग करून ते पैसे सुखरूप परत मिळविण्याची किमया येथील विद्यार्थ्याने केली आहे. चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला तरीही पैसे परत मिळवण्यात त्याला यश आले.
याबाबत अधिक माहिती अशी, रयत शिक्षण संस्थेतील निवृत्त प्राध्यापिका तथा येथील महालक्ष्मी महिला मंडळाच्या अध्यक्षा पद्माताई बाळासाहेब भोसले-पाटील ह्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या येथील महामार्गालगतच्या शाखेत गेल्या होत्या. त्यांनी बँकेतून 30 हजार रुपये काढून पिशवीत ठेवून ती पिशवी घेऊन घरी निघाल्या होत्या. त्यावेळी घरापासून काही अंतरावर पाठीमागून आलेल्या चोरट्याने त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून पळ काढला. त्यावेळी भोसले यांनी आरडा-ओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून कर्मवीर भाऊराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिकणारा विद्यार्थी ओंकार सुनील खरे हा धावत आला. त्याने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चोरट्याने भोसले यांचे पैसे असणारी पिशवी टाकून पळ काढला. चोरटा पळून गेला मात्र पैसे परत मिळाल्याने भोसले यांनी सुटकेचा निश्वास सोडला.