नवकार महामंत्रात विलक्षण शक्ती ! प.पू.त्वज्ञ साधिका प.पू.विचक्षणाश्रीजी
जालना, दि. 18 - एका कठीण प्रक्रियेतून गेल्यानंतरच आपल्याला हवे साध्य होत असते. मात्र कसलीही प्रक्रिया न करता केवळ ढोंग केल्याने काहीही प्राप्त होत नाही. नवकार महामंत्रात फार मोठी विलक्षण अशी शक्ती आहे. तथापि, त्याचा अंमल योग्य प्रकारे होत नसल्यानेच नवकार महामंत्राचा प्रभाव दिसत नाही आणि मग आपण कर्माऐवजी इतरांना दोष द्यायला लागतो. याला परमार्थ म्हणता येणार नाही, असे मत तत्वज्ञ साधिका प. पू. श्री विचक्षणाश्रीजी म. सा. यांनी येथे बोलतांना व्यक्त केले.येथील श्री. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या चातुर्मास कल्प आराधना पर्वातील प्रवचनात त्या बोलत होत्या.