Breaking News

नऊ जिल्ह्यांसाठीच्या सैन्य भरतीला सुरूवात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या मैदानावर जय्यत तयारी

नांदेड, दि. 19 - नांदेडसह नऊ जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांसाठी बुधवार दि. 20 जुलै 2016 पासून सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीची प्रक्रिया  मंगळवार 19 जुलैच्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून सुरु होणार आहे. पुढे ही प्रक्रिया जिल्हा निहाय 3 ऑगस्ट 2016 पर्यंत सुरु राहणार आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या मैदानावर हा सैन्य भरती मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. या पूर्व  तयारीसाठी भरती अधिकारी, जिल्हा प्रशासन व विद्यापीठ तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांची प्रत्यक्ष भरतीस्थळावर नियोजनाची बैठक झाली.
पोलीस बंदोबस्त, वैद्यकीय तसेच स्वच्छता यांच्यासह अनुषांगिक विविध सुविधांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. बैठकीला भरती अधिकारी कर्नल एम. पी.  सिंह यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक संजय ऐनपुरे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार,  महापालिकेचे सहायक आयुक्त येवले, तहसीलदार प्रदीप नरसीकर, सहायक परिवहन अधिकारी विजय तिराणकर यांच्यासह बांधकाम, महावितरण, भारत संचार  निगम तसेच विद्यापिठाच्या प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.