50 हजार रुपये प्रामाणिकपणे परत करणार्या पेटरक यांचा सन्मान
अहमदनगर, दि. 10 - प्रोफेसर कॉलनी चौकातील युनियन बँकेचे खातेदार हवामानतज्ज्ञ प्रा. बी. एन. शिंदे पैसे भरण्यासाठी आले होते. या दरम्यान त्यांचे पैसे खुर्चीच्या पाठीमागे पडले होते. याकडे त्यांचे लक्ष गेले नाही. मात्र, बँकेत साफसफाई करताना बँकेतील कर्मचारी लिलाबाई पटेकर यांना हे पैसे आढळून आले. त्यांनी याकडे तातडीने बँकेचे व्यवस्थापक अरविंद कचरे यांचे लक्ष वेधले.
कचरे यांनी सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज तपासले. त्यानंतर शहानिशा करून हे पैसे प्रा. शिंदे यांचे असल्याचे निष्पन्न झाले. हे पैसे त्यांना परत करण्यात आले. लिलाबाई पटेकर यांना आढळून आलेले हे पैसे त्यांनी प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल बँकेच्या वतीने व शिंदे कुटुंबीयांच्या वतीने त्यांचे आभार मानून सत्कार करण्यात आला. यावेळी खातेदार भास्कर पोटे, पवन शिंदे, अवश्री बेहरा, अनुजा लोखंडे आदी उपस्थित होते. आजकाल प्रामाणिक लोकांची संख्या कमी झाल्याचे चित्र असताना शिपाई म्हणून काम करणार्या व गरीब कुटुंबातील असलेल्या लिलाबाई पेटकर यांनी पैसे परत करून प्रामाणिकपणा दाखवून दिला आहे. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
लिलाबाई पेटकर म्हणाल्या की, पैसे सापडल्यानंतर आपण पहिल्यांदा व्यवस्थापकांकडे ते दिले. त्यानंतर मनावरील ताण कमी झाला. आपण प्रामाणिकपणा दाखवून हे पैसे परत केले. आपण आपले काम केले. माझ्या प्रामाणिकपणाचा हा सन्मान आहे, असे त्या म्हणाल्या.