गोदापात्रात रेती तस्करांचा हैदोस;पोलीस झालेत हप्त्याने मदहोश
गंगाखेड/प्रतिनिधी, दि. 11 - गोदावरी पात्रात रेलवे पुल परिसरात वाळु उपा करतांना पोलीस प्रशासनाने जप्त केलेल्या जेसीबीवर गुन्हा दाखल न करता आर्थिक तडजोडीतुन सोडण्यात आल्याने रेती तस्कर व पोलीस प्रशासनामध्ये आर्थिक मधुर संबध असल्याचे उघड झाले आहे. पोलीसांच्या अर्थपुर्ण व्यवहारातुन रेती तस्कर दिवसा ढवळ्या नदी पात्रात जेसीबीव्दारो रेतीचा उपसा करत असतांना प्रशासन मात्र उघड्या डोळ्याने याकडे दुर्लक्ष करत आहे.
गंगाखेड शहर गोदावरी नदीच्या तीराव असुन जवळच नदीचे मोठे पात्र येथील रेती तस्कारांच्या कमाईचे साधन झाले आहे. शहराच्या सौदर्यात्मक वैभवात भर पाडणार्या गोदावरीच्या पात्रातील रेती उपसून पात्र कपाळ पुसलेल्या विधवेसारखे करण्यासाठी येथील रेती तस्करच कारणीभुत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नैसर्गीक साधन संपत्ती संवर्धन करने प्रशासनासह नागरीकांची महत्वपुर्ण जबाबदारी असल्याने अवैध रित्या रेतीचा बेमाप उपसा करणार्या धडा शिकवलाच पाहिजे. परंतु जनतेच्या संरक्षणात्मक जनतेच्या आवाजाला प्रशासनापर्यंत पोहचविण्यास सहकार्य करणार्या पोलीसांनी नागरीकांच्या अपेक्षांचा भंग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच गंगाखेड शहरातील अवैध धंदेवाईक नागरीक आपली मनमानी करुन गोदापात्राला खानी स्वरुप आणत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे विशेष लक्ष केंद्रीत करुन गंगाखेड स्थिती गोदावरी नदीच्या पात्रातुन अवैधरित्या रेती उपसा करणार्यांवर कडक कारवाई करावी. रेती तस्करां सोबत अर्थपुर्ण व्यवहार करणार्या पोलीस प्रशासनातील, अधिकारी कर्मचार्यांसह महसुल विभागातील रेतीच्या काळ्या पैशाने बरबटलेल्या हाताच्या अधिकार्यांवर कारवाई करावी अशी गंगाखेड शहर हितकार गोदावरी नदी संवर्धीतप्रेमी नागरीकांकडून होत आहे. अन्यथा गंगाखेडची जनता स्वतः होवून पोलीस प्रशासन, महसुल प्रशासनासह अवैधरित्या रेतीचा उपसा करणार्या रेती तस्काराना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष देवून रेती तस्करांच्या मुसक्या आवळाव्यात हीच अपेक्षा सर्वस्तरातुन व्यक्त करण्यात येत आहे.