Breaking News

राज्यातील दुष्काळाचे सावट आता दूर - गिरीष महाजन

नाशिक, दि. 17 - मराठवाडा वगळता राज्यात पावसाची स्थिती चांगली आहे. राज्यातील दुष्काळाचे सावट आता दूर झाल्याचे सांगून जलसंपदा मंत्री गिरीष  महाजन यांनी समाधान व्यक्त केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणालेत, की मंत्रीमंडळ विस्तारात मला माझे आवडते खाते मिळाले आहे. त्यामुळे मी समाधानी आहे. लवकरच वैद्यकीय क्षेत्रात चांगले बदल  पाहायला मिळतील असेही, त्यांनी सांगितले. तसेच नाशिक महापालिका आयुक्तांची बदली ही प्रशासकीय बाब आहे. कुणाच्या दबावामुळे ही बदली झाली नसल्याचे  त्यांनी स्पष्ट केले. नाशिकमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असताना ते बोलत होते
.