अग्निशमन दलाच्या रेस्क्यू ऑॅपरेशन दरम्यान हुल्लडबाजीचा अनुभव
नाशिक, दि. 17 - वकीलवाडी परिसरात एक जुने झाड कोसळल्याने नागरिकांची धावपळ उडाली. या झाडाखाली तीन युवक अडकल्याने अग्निशमन विभागाला कळवण्यात आले. सुमारे दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचार्यांनी या युवकाला बाहेर काढले. मात्र या रेस्क्यू ऑॅपरेशन दरम्यान नाशिककरांच्या हुल्लडबाजीचा दुखद अनुभव देखील अग्निशमन विभागाच्या कर्मचार्यांना घ्यावा लागला.नाशिकच्या वकीलवाडी परिसरात आज एक जुने झाड कोसळले आणि परिसरात एकच धावपळ उडाली. शहरातील मध्यवर्ती आणि सर्वात रहदारीचा मार्ग म्हणून वकीलवाडी परिसर ओळखला जातो. मात्र याठिकाणी असलेले एक जुने लिंबाचे झाड दुपारच्या सुमारास कोसळले आणि या झाडाच्या आवाजानेच अनेकांच्या ह्रदयाचा ठोका चुकला. या झाडाखाली एक बाइकस्वार अडकल्याचे लोकांना कळाल्याने तात्काळ अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. अवघ्या काही मिनिटात अग्निशमनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि कटर, जॅक आणि इतर साहित्यांच्या मदतीने झाडाखाली अडकलेल्या युवकाला दीड तासाच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात आले. या तरुणाला किरकोळ जखम झाल्याने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.