Breaking News

आयुक्तांच्या बदलीप्रकरणी सातपूरला मनसेतर्फे भाजप सरकारचा निषेध

सातपूर/प्रतिनिधी। 11 - सातपूरला मनसेच्या वतीने नाशिक मनपाचे कर्तव्यदक्ष आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या बदलीच्या निषेदात भाजप सरकारचा तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त केला. यावेळी रद्द करा, रद्द करा आयुक्ताची बद्दलि रद्द करा, सरकारचा धिक्कार असो अशा घोषणांनी सातपूर कॉलनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी नगरसेवक सलीम शेख यांच्या संपर्क कार्यलयात बदली रोखण्यासाठी आणि सरकारचा निषेद व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी दिवसभर स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. स्वाक्षरी करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.आयुक्तांच्या बदलीचा  निषेद करण्यासाठी स्थायी सभापती सलीम शेख,सातपूर मनसे विभाग अध्यक्ष सोपान शहाणे,प्रकाश निगळ, सचिन सिन्हा,एजाज शेख, अंबादास आहिरे,शंकर देवघरे,अमोल गवळी,गौरव आहिरे,वैभव महिरे,निशांत शेट्टी,राजू पाटील,विजय आहिरे, व सातपूर मधील मनसेचे सर्व पदाधिकारी व सदस्य,व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.