व्यापारी वर्गाने लिलावात सहभागी व्हावे - कृउबा सभापती होळकर
लासलगाव/प्रतिनिधी। 11 - शासनाच्या अध्यादेशाला विरोध करणा-या व्यापा-यांनी सोमवार (दि. 11) पासुन लिलावात सहभागी न झाल्यास शेतकरी हितासाठी लिलावाच्या अन्य पर्यायांचा विचार करण्यात येईल असा निर्णय सदस्य मंडळाच्या बैठकीत घेतला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर व उपसभापती सुभाष कराड यांनी दिली. शासनाच्या नियमन मुक्तीच्या अध्यादेशात फळे व भाजीपाल्याचे नियमन रद्द करण्याबरोबरच अडत शेतक-यांऐवजी खरेदीदारांकडुन घेणेबाबत शासनाने जो निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व व्यापारी कामकाज करणेस असमर्थ असल्याच्या कारणावरून दि. 09 पासुन सर्व व्यापारी लिलावात सहभागी होणार नसल्याचे असोशिएशनने बाजार समितीस कळविले आहे. त्यामुळे लिलाव सुरू होणेबाबत उपाययोजना करणेकामी आज बाजार समितीच्या सदस्य मंडळाची तांतडीची बैठक बोलाविणेत आली होती. सदर बैठकीत दैनंदीन लिलावाचे कामकाजात कार्यरत असलेल्या व्यापारी वर्गास दि. 11 पासुन लिलावात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात यावे. त्यांचेकडुन प्रतिसाद न मिळाल्यास शासनाने पर्यायी विक्री व्यवस्थेसाठी स्थापन केलेले नोंदणीकृत थेट पणन परवानाधारक, शेतकरी समुह, शेतकरी सहकारी संस्था, ग्राहक सहकारी संस्था, महिला बचत गट, सेवा सहकारी संस्था, शेतकरी गट, कंपनी, खाजगी उद्योग, नोंदणीकृत कँपन्या, व्यक्ती आणि भागीदारी संस्था, नाफेड व मार्केटींग फेडरेशन यांचेमार्फत खरेदी-विक्री सुरू करणेसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा. तसेच शेतमाल खरेदी-विक्रीसाठी इच्छुक असलेल्या अन्य व्यापा-यांना सुविधा पुरविणे यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी बाजार समितीचे सदस्य राजेंद्र डोखळे, पंढरीनाथ थोरे, भास्कर पानगव्हाणे, मोतीराम मोगल, बाळासाहेब क्षिरसागर, अशोक गवळी, वैकुंठ पाटील, संदीप दरेकर, सचिन ब्रम्हेचा, रमेश पालवे, सचिव बी. वाय. होळकर यांचेसह अनिल सोनवणे उपस्थित होते.
यावेळी बाजार समितीचे सदस्य राजेंद्र डोखळे, पंढरीनाथ थोरे, भास्कर पानगव्हाणे, मोतीराम मोगल, बाळासाहेब क्षिरसागर, अशोक गवळी, वैकुंठ पाटील, संदीप दरेकर, सचिन ब्रम्हेचा, रमेश पालवे, सचिव बी. वाय. होळकर यांचेसह अनिल सोनवणे उपस्थित होते.
