सदाभाऊ कारखानदारांचे मंत्री ः रघुनाथदादा
सांगली, दि. 12 - सदाभाऊ खोत यांच्या मंत्रिपदासाठी शेतकरी हिताची चळवळ भाजपकडे गहाण टाकली. ऊसदराच्या आंदोलनात केलेल्या तडजोडीचे बक्षीस म्हणून सर्वपक्षीय कारखानदारांनी मंत्रिपदाचे बक्षीस दिले, असा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी बोलताना केला.
ते म्हणाले, चार आमदार असताना सांगलीत भाजपचे मंत्री होत नाही, स्वाभिमानीला मंत्रिपद मि
ळते, याचा अर्थ समजून घ्या. सरकारला चळवळ कमकुवत करायची आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी असो किंवा भाजप, त्यांचे उद्देश स्पष्ट आहेत. अशा सरकारमध्ये मंत्री व्हावे हे दुर्दैव आहे. जेंव्हा शेतकर्यांचे सरकार असेल तेंव्हा ह्यांनी मंत्री व्हायला हवे. संघटनेत मोठे व्हायचे आणि कुणाचा तरी पदर धरुन पळून जायचे, असा प्रकार केला आहे.
हे सरकार शेतकरी हिताचे एकही वचन पाळायला तयार नाही. ऊसाला एकरकमी एफआरपी द्यायचा नियम असताना 80 टक्क्यांवर का मान्य केेले.मुख्यमंत्र्यांनीच कायदा मोडायला मान्यता दिली. गेली तीन वर्षे केंद्रात भाजपचे सरकार आहे, एफआरपीत एक रुपयाची वाढ नाही. शेतकरी आत्महत्त्येचा टक्का वाढतोय, तरी हे गप्प, हे शेतकरी हितासाठी नव्हे तर त्यांच्या अन्नात माती कालवण्यासाठी मंत्री झाले.