सीलॉर्ड कंपनीला टाळे ठोकावेच लागेल : राणे
मुंबई, दि. 18 - श्रीमतांच्या मुंबई नगरीत माहुल-आंबेपाडा आणि कोळीवाडा येथील सामान्य नागरिक एका रासायनिक कंपनीच्या रासायनिक अत्याचाराने प्राण कंठाला येऊन जगत आहेत. माणसाच्या जीवापेक्षा सीलॉर्ड कंटेनर कंपनी पैशाच्या जोरावर आज हजारो नागरिकांच्या जीवावर उठलेली आहे आणि या कंपनीच्या विरोधात सरकार कोणतेही पाऊल उचलायला तयार नाही, त्यामुळे संतप्त झालेले माहूल-आंबापाडा आणि कोळीवाडयातील हजारो नागरिक जीवावर उदार होऊन कंपनीला टाळे ठोकायला निघालेले आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नारा
यण राणे माहूल-आंबापाडा आणि कोळीवाडा या परिसराला भेट दिल्यानंतर जे भीषण सत्य त्यांच्यासमोर आले, त्यावेळी संतत्प नागरिकांना शांत करून या कंपनीला टाळे ठोकण्याचे आंदोनल मी स्वत: पुढाकार घेऊन करेल, असे आश्वासन त्यांनी दिल्यामुळे बुधवारचा या कंपनी विरोधातील नागरिकांचा संताप काहीसा शांत झाला.
आजपर्यंत अनेक आमदार-खासदारांनी या परिसरातील सीलॉर्ड या विषारी वायू?सोडणा-या कंपनीविरोधात कारवाई करण्याची आश्वासने दिली. परंतु प्रत्यक्षात काहीही केलेले नाही. त्याचा पाढा आमदार नारायण राणे यांच्यासमोर हजारो नागरिकांनी एका मोठया सभेत वाचल्यानंतर महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशनात या कंपनीच्या विषारी कारवायांविरुद्ध आवाज उठवण्याचे आश्वासन नारायण राणे यांनी दिले.
चेंबूर परिसरातील सीलॉर्ड कंटेनर कंपनीने घातक रसायनाद्वारे येथील नागरिकांचे जीवन हैराण करून टाकले असून, घरोघरी दमा, खोकला, ताप या रुग्णांना या रासायनिक वायूचा कमालीचा त्रास होत असून, फुप्फुसाचे रोग निर्माण झालेले आहेत. त्याविरोधात माहूल-आंबापाडा प्रदूषण विरोधी कृती समिती स्थापन झालेली आहे.