हायटेक सेन्सर्स करणार ‘मेट्रो पूला’ची देखभाल
पश्चिम द्रूतगती महामार्गावर असलेल्या जोग उड्डाणपुलावर उन्नत मार्गे जाणा-या मेट्रोसाठी केबलवर स्थिरावलेला पूल बनवण्यात आला आहे. मेट्रोच्या फे-यांमुळे पुलाला बसणारे हादरे, वा-याचा वेग, तापमान, पुलाची क्षमता आदी गोष्टींबाबत पुलाची देखभाल करण्याच्या दृष्टीने पुलावर विविध ठिकाणी 25 सेन्सर्स बसवण्यात आले असून काही त्रुटी आढळल्यास सेन्सर्सद्वारे त्याचा संदेश लगेच मिळेल, असे ‘मुंबई मेट्रो वन प्रायवेट लिमीटेड’द्वारे (एमएमओपीएल) सांगण्यात आले.
एमएमआरडीए आणि एमएमओपीएलद्वारे मेट्रो-1 प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे. 2014साली राज्यातील पहिली मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. पष्टिद्धी(155)म द्रूतगती महामार्गावर असलेल्या मेट्रोच्या केबल पुलाने अनेकांचे लक्ष वेधले. 89 मीटर लांबी, 39 मीटर उंच पायलॉन आणि 19 मीटर उंच ब्रिज डेक, असे स्वरूप असलेल्या या अनोख्या केबल पुलाची देखभाल करण्याच्या दृष्टीने एमएमओपीएलने पाऊल उचलले.
‘स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटरींग सिस्टीम’ अंतर्गत या पुलाला स्वित्झर्लंडलँडमधील एका कंपनीने 25 हायटेक सेन्सर्स बसवले असून त्यावर 2.5 कोटींचा खर्च झाला आहे. पष्टिद्धी(155)म द्रूतगती महामार्गावर एक मोठा केबल पूल बांधण्यात आल्याने सुरक्षेच्या दृष्टीने पुलाची देखभाल करणे गरजेचे आहे. त्यासाठी सेन्सर्सचा वापर करण्यात आला असल्याचे एमएमओपीएलद्वारे सांगण्यात आले.
मेट्रोच्या फे-यांमुळे केबल पुलावर काही परिणाम होतो का, हादरे, वा-याचा वेग, वातावरणस्थितीमुळे पुलावर काही परिणाम होतो का? याची नोंद सेन्सर्सद्वारे केली जाईल. मेट्रोच्या पश्चिम द्रूतगती महामार्ग स्थानकावर कंट्रोल रूम असून या रूमद्वारे सेन्सर्सवर लक्ष ठेवले जाईल. याची महिनाभरासाठी चाचणीही घेण्यात आली होती.
