Breaking News

ट्रक, ट्रॅक्टरची भीषण धडक

काष्टी  (प्रतिनिधी) । 10 - ट्रक, ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले. सुदैवाने जीवित हानी टळली. नगर- दौंड मार्गावरील बेलवंडी फाट्यानजीक शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. 
नगरवरुन पशुखाद्य घेऊन हा ट्रक (एम. एच. 15, ए.जी 5958) बेलवंडी फाट्यानजीक आला असता यावेळी समोरून नगरच्या दिशेने जाणार्‍या ट्रॅक्टरमध्ये ( एम.एच.42 /

ए वाय 1928) समोरासमोर जोराची धडक झाली.
ही धडक इतकी भीषण होती की ट्रकची पुढील बाजू पूर्णपणे दबून दोन्ही चाके निखळून बाजूला पडली. तर ट्रॅक्टरचे दोन भाग झाले. ट्रॅक्टर चालकाने प्रसंगावधान दाखवत उडी मारल्याने तो बचावला.
पहाटेच्या दरम्यान अपघात झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. बेलवंडी फाट्यानजीक ट्रक व ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर जोराची धडक होऊन अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.