Breaking News

अ‍ॅनेमेस्टी कर कार्यशाळा; वर्धमान अर्बनचा स्तुत्य उपक्रम

बुलडाणा, दि. 17 - बुलडाणा येथील गर्दे वाचनालयाच्या साागृहात वर्धमान अर्बन को-ऑप क्रेडीट  सोसायटी म. बुलडाणाच्या वतीने व्यासायीक, व्यापारी, उद्योजक, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, नोकरदार यांच्या करीता भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांनी जाहिर केलेल्या अ‍ॅमेनेस्टी योजनेची माहिती व्हावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पार पडलेल्या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात उपविक्रीकर आयुक्त टि.के. पाचरणे व कर निरीक्षक उध्दव देशमुख व अ‍ॅड. डॉ. विलास सावजी मार्गदर्शक म्हणुन होते. अ‍ॅड. विलास सावजी यांनी महाराष्ट्र शासनाच्या विक्रकर बाबतची अ‍ॅनेमेस्टी योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ज्या व्यक्ती वा संस्थेकडे बि.एस.टी.अ‍ॅक्ट, सि.एस.टी अ‍ॅक्ट नुसार कराची थकबाकी आहे, त्यांना या योजनेत केवळ थकबाकी म्हणजे कराची मुद्दल रक्कम ारावी लागेल. त्यावर कोणतेही व्याज वा दंड सरकार या योजनेत घेणार नाही. तसेच ज्या व्यक्ती वा संस्थेकडे व्हॅट कराची थकबाकी आहे, त्यांनी थकीत कराची रक्कम व त्यावर आजतागायत होणार्‍या व्याज्याच्या रकमेच्या एक चतुर्थांश व्याज देय असेल परंतु त्या व्यक्तीने वा संस्थेने अपील केलेले असेण आवश्यक असेल, असे प्रतिपादन केले. तर पाचारणे व उध्दव देशमुख यांनी नागरिकांच्या शंकांचे समाधान केले. त्यानंतर दुसर्‍या सत्रात सहाय्यक आयकर आयुक्त अकोला पी.पी. महाजन, आयकर अधिकारी खामगांव रुपा धांडे, आयकर अधिकारी हेमंतकुमार नीम, सी.ए.शेखर धरणगांवकर यांनी मार्गदर्शन केले. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी विविध योजना आखाव्या लागतात त्या करीता आर्थीक नियोजन करावे लागते व प्रत्यक्षकर व अप्रत्यक्ष कर हे सरकारचे उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. ज्या व्यक्ती वा संस्थेंनी आपले उत्पन्न लपविले असेल व त्यावरील कर चुकविला असेल त्यांना या योजनेचा लाभ आपले उत्पन्न जाहिर करुन त्यावर 45 टक्के आयकर भरुन घेता येतो. आयकर कार्यालय अशा योजनेत आलेल्या व्यक्तींची व संस्थेची कोणत्याही प्रकारची चौकशी करणार नाही. ही माहिती कोणाशीही उघड करणार नाही असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला बुलडाणा शहरातील व्यापारी, उद्योजक, नोकरदार, डॉक्टर, इंजिनिअर, वकील व इतर नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. जितेंद्र एन. जैन यांच्या सहकार्याने कार्यक्रम आयोजित झाला म्हणुन कर सल्लागार मंडळातर्फे  अ‍ॅड. श्रीकर व्यवहारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन अ‍ॅड. धिरज गोठी यांनी केले तर आभार प्रदर्शन वर्धमान अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी म.बुलडाणाचे अध्यक्ष जितेंद्र एन. जैन यांनी केले. तसेच के.एफ. भंसाली, जोशी, अ‍ॅड. बेदरकर, हरीष निर्मल, योगेश क्षिरसागर, कर सल्लागार तसेच वर्धमान अर्बन को-ऑप क्रे. सोसा. कर्मचार्‍यांनी अथक परिश्रम घेतले.
यानंतर फेंग बिंग यांनी बुलडाणा अर्बन संस्थेच्या सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, येळगांव येथील गोदाम, चिखली येथील कोल्ड स्टोअरेज, डोंगरखंडाळा येथील स्पिनिंग व टेक्सटाईल मिल, बुलडाणा शहरातील स्वच्छता अभियान, गवदत्तक योजनेअंतर्गत काही गावे तसेच संस्थेच्या विविध मॅन्युफॅक्चरिंग युनिटला भेटी दिल्या. यावेळी बुलडाणा अर्बनने आर्थिक व समाजिक कार्याच्या माध्यमातून केलेले कार्य एक माईलस्टोन असून हे सर्व उपक्रम पाहून आपण आश्‍चर्यचकीत झालो आहे. सहकाराच्या माध्यमातून समाजातील सर्वस्तरातील घटकांचा विकास होवून त्यांना दिलासा मिळू शकतो आणि त्यामुळेच आपण प्राधान्याने बुलडाणा अर्बन संस्थेला भेट देण्याचा निर्णय घेतला होता अशी प्रतिक्रीया फेंग बिंग यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली.