Breaking News

खामगांव-जालना रेलेमार्गला प्रारंभ कधी? : खा. जाधव

बुलडाणा, दि. 23 - औद्योगिक दृष्ट्या मागास असलेला विदरर्भातील पश्‍चिम वर्‍हाड अन मराठवाड्याच्या भागाला विकासाची गती देण्यासाठी भविष्यात परिसस्पर्श ठरावा, असा खामगांव-जालना रेल्वे मार्गाची घोषणा 2015-16 च्या वित्तीय वर्षातील बजेटमध्ये  रेल्वेमंत्री ना. सुरेश प्रभ्ाु यांनी केली होती. मात्र, प्रत्यक्ष या मार्गावर रेल्वे जाळ्या संबंधी कुठलेच काम सुरु नाही. जनाावनेचा या रेल्वेमार्गाशी जुळलेला शतकोत्तर वर्षांचा धागा पाहता या मार्गाचा कामाचा प्रारंभ कधी होणार असा सवाल बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत उपस्थित केला. दिल्ली येथे संसदेचे अधिवेशन चालु आहे. यामध्ये लोकसभेत शिवसेनेचे खा. प्रतापराव जाधव यांनी शेतकर्‍यांसह, औद्योगिक विकासाच्या संदर्भात जनसमस्यांच्या भावना मांडल्या. यावेळी शुन्य प्रहरात खा. जाधव म्हणाले की, विदर्भाला आत्महत्याग्रस्त शेतकरी प्रदेश असा डाग चिकटला आहे. मराठवाड्यातही शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शासन मदत करत नाही, अस नाही. मात्र, शेतीपुरक व्यवसायांचे उत्पन्न शेतकर्‍यांच्या घरापर्यंत पोहचने आवश्यक आहे. यासाठी रेल्वेचे जाळे विस्तारलेले हवे. आजही मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्यातील घाटावरील भागात शेतीउत्पादन महानगरापर्यंत पोहचविण्यासाठी रेल्वेट्रॅक उपलब्ध नाही. इंग्रज राजवटीपासुन मागणी असलेल्या खामगांव-जालना रेल्वे मार्गाला गत रेल्वे बजेटमध्ये ना. सुरेश प्रभ्ाुंची कृपा झाली. यासाठी शिवसेना अनेकवर्षापासुन आग्रही मागणी करत आहे. 162 कि.मी.च्या या ब्रॉडगेजलाईन निर्माण करण्यासाठी यामध्ये मंजुरी देण्यात आली आहे. 3 हजार कोटी रुपयांच्या वर मान्यता देण्याता आल्याचेही सांगण्यात आले. विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा हा मार्ग राज्यात रेल्वेचे नवे जाळे विस्तारीत करेल. मात्र, सध्या या लाईनवर कुठलेच काम सुरु नाही. यासाठी जनतेमध्ये रोष आहे. त्यामुळे जनभावनेचा आक्रोश सरकारला सहन करावा लागु शकतो. रेल्वे  मंत्रालयाने या प्रस्तावित मार्गावरची सध्यास्थिती काय आहे. याची  माहितीसुध्दा जनतेला द्यावी. लवकरात लवकर हे काम पुर्ण होवुन मागास समजल्या जाणार्‍या या भागात विकासाचा ट्रॅक तयार करणे आवश्यक आहे.  त्यामुळे सरकारने खामगाव-जालना रेल्वे मार्गाप्रती तत्परतेचे धोरण आखत हा प्रस्तावित मार्ग पुर्ण करण्याची मागणी खा. प्रतापराव जाधव  यांनी केली आहे.