आजच्या डॉक्टरांनी डॉ.रॉय यांची प्रेरणा घ्यावी
अहमदनगर, दि. 08 - भारतरत्न डॉ. बी. सी. रॉय यांची आज जयंती व पुण्यतिथी आहे. डॉ. राय यांनी कुठलीही तमा न बाळगता रुग्णांची सेवा केली. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून त्यांनी समाजापुढे आदर्श ठेवले. डॉ. रॉय यांच्यापासून प्रेरणा घेऊन आजच्या डॉक्टरांनी काम करावे, असे प्रतिपादन डॉ. एस. एस. दीपक यांनी केले.
डॉक्टर्स डेनिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन व युवक बिरादरीच्या वतीने महावीरनगर येथे डॉ. एस. एस. दीपक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी असो.चे अध्यक्ष डॉ. पांडुरंग डौले, डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. रवींद्र सोमाणी, आर्किटेक्ट कंचन कांकरिया, वसंत लोढा, श्याम चोरडिया, डॉ. धनंजय कुलकर्णी, डॉ. श्याम तारडे, डॉ. धनंजय वाघ, डॉ. अर्जुन शिरसाठ, डॉ. प्रीती थोरात, संगीता कांडेकर, राहुल थोरात, डॉ. आरती होशिंग, डॉ. सुनीता अकोलकर, डॉ. वैशाली किरण, डॉ. प्रमोद कापसे, डॉ. निसार शेख आदी उपस्थित होते.
डॉ. दीपक पुढे म्हणाले की, डॉ. रॉय यांच्या कामाची दखल घेत भारत सरकारने त्यांना 1961मध्ये भारतरत्न देऊन सन्मानित केले. डॉक्टर हा दिवस रात्र रुग्णांची सेवा करीत असतो. ही सेवा देत असताना त्यांचंही कोणीतरी कौतुक करायला हवे. समाजाने त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली पाहिजे. डॉक्टरांचं आणि समाजाचं नातं आणखी दृढ व्हावं, यासाठी डॉक्टर्स दिन साजरा केला जातो, असे ते म्हणाले.
आयएमएचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग डौले म्हणाले की, डॉक्टर्स डे निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान व रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले. आयएमएच्या वतीने नेहमीच डॉक्टरांसाठी चर्चासत्रे, मार्गदर्शन कार्यक्रम, तसेच समाजासाठी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते, असे सांगितले.