Breaking News

मेट्रो मार्ग : गिरगांव-काळबादेवी रहिवाशांचे स्थलांतर नाही

मुंबई, दि. 19 - एखादा नवीन प्रकल्प बनवताना त्यासमोरील आव्हाने संबंधित प्रशासनाद्वारे लक्षात घेतली जातात. मग ते आव्हान बांधकामाचे असो, बांधकामाबाबत परवानगी मिळवण्याचे असो किंवा बांधकामामुळे बाधित होणा-या रहिवाशांचे स्थलांतर असो. मात्र मुंबई शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पांची रचना करताना बांधकामामुळे येणा-या समस्या, रहिवाशांच्या स्थलांतराचे नियोजन, तिकीट दर यामध्ये संबंधित प्रशासन कुठेतरी कमी पडत असल्याचे दिसत आहे. क
दाचित यामुळेच मेट्रो मार्ग ‘वादा’चा बनत चालला आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो-1 ही 2014साली प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. पूर्व ते पश्‍चिम असा थेट प्रवास करवणा-या या मेट्रो सेवेला प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. सध्याचे तिकीट दर 10 ते 40 रु. असून प्रस्तावित तिकीट दर 110 रु. आहे. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर पसरला असताना तिकीट दराचा तिढा न्यायप्रविष्ट असून अद्यापही सुटलेला नाही. दुसरीकडे ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’द्वारे (एमएमआरसी) कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो-3 प्रकल्पाचे बांधकामाचे कंत्राट पाच कंपनी समूहाला नुकतेच देण्यात आले. प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला गती देण्याचा प्रयत्न एमएमआरसीद्वारे केला जात असताना आरे येथील कारशेड, गिरगाव-काळबादेवी रहिवाशांचे स्थलांतर या समस्यांवर अद्यापही तोडगा निघाला नाही.