नक्षली हल्ल्यांत 10 जवान शहीद
औरंगाबाद, दि. 19 - सोमवारी रात्री झालेल्या नक्षलवादी हल्ल्यांत बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे सीआरपीएफ 10 जवान शहीद झाले.पोलिस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात 10 जवान शहीद झाले असून, यामध्ये सीआरपीएफच्या कोबरा बटालियनच्या आठ अधिकार्यांचा समावेश आहे. यावेळी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले आहेत. या चकमकीत काही जवान जखमी झाले असून, त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.