एकीकडे डागुडुजी तर दुसरीकडे चाळणी
औरंगाबाद, दि. 09 - दुरसंचार कंपनीच्या कामासाठी पुन्हा औरंगाबाद-जळगाव महामार्ग खोदण्याचे काम सुरु झाल्याने ऐकीकडे महामार्गाची डागाडूजी सुरु असतांना दुसरीकडे मात्र चाळणी करने सुरुच आहे. औरंगाबाद-जळगाव महामार्गा लगत एका दुरसंचार कंपनीचे केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. अजिंठा जवळ चक्क महामार्गा वरूनच खोदकाम करण्यात येत आहे.यामुळे प्रवाशांना, वाहन चालकांना तर मनस्ताप सहन करावा लागतच आहे. शिवाय वारंवार होत असलेल्या खोदकामामुळे रस्त्या काठचे व्यवसायीक दुकानदार त्रस्त झाले आहे.वांरवार खोदकामामुळे चाळणी औरंगाबाद-जळगाव व बुलढाणा-अजिंठा मार्गालगतदुरसंचार कंपण्यांचे केबल टाकण्याचे कामे वारंवार सुरुच असतात. अनेकादा काठावरचा रस्ता अरुंद असल्यास डांबर रस्ता सुध्दा खोदण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्याची चाळणी होत असून, वाहनांना अपघाताचा धोका निर्माण होत आहे.
