Breaking News

अवैध दारू विक्रीसंदर्भात रनरागिणी रस्त्यावर सिल्लोड

औरंगाबाद, दि. 09 - सिल्लोड तालुक्यातील पालोद गावात सर्रासपणे अवैधरित्या दारू विक्री सुरू आहे व दारू पिणार्‍यांमुळे त्यांच्या घरांवर उपासमारीची वेळ आली असून, याकडे ग्रामीण पोलिस गंभीरपणे पाहत नाहीत. त्यामुळे महिलांची एल्गार  पुकारला आहे.
यासंबंधी मागील तीन महिन्यांपूर्वी एक निवेदन सपोनि शंकर शिंदे यांना दिले होते. त्यांनी कारवाईचे आश्‍वासनही दिले होते, परंतु एकदाही कारवाई झाली नसल्याने तेथील महिलांनी पुन्हा पोलिस ठाण्याचा दरवाजा खटकावा लागला. या दुष्काळ परिस्थितीत या हातचे काम सोडून पोलिसांना किती वेळा निवेदन द्यावी लागेल, असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला आहे.