Breaking News

कुर्लीत शाळकरी मुलाची आत्महत्त्या

सांगली, दि. 19 - खानापूर तालुक्यातील कुर्ली येथील वैभव किसन कांबळे (15) या शाळकरी मुलाने राहत्या घरी तुळईला साडीने गळफास घेऊन आत्महत्त्या  केली. ही घटना सायंकाळी 5.20 वाजण्याच्या सुमारास घडली. कुर्ली येथील वैभव कांबळे हा इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे वडील गवंडी काम  करतात. आई शेतात गेली होती. दुपारपासून वैभव एकटाच घरी होता. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याने राहत्या घरातील तुळईला साडीने गळफास  घेऊन आत्महत्त्या केली. हा प्रकार शेजारच्या लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वैभवच्या आईला घटनेची माहिती दिली. त्याच्या पश्‍चात आई, वडील,  भाऊ, बहीण असा परिवार आहे. पोलिस पाटील वैशाली कुर्लीकर यांनी विटा पोलिसांना याबाबत माहिती दिली. मनमिळाऊ वैभवच्या आत्महत्त्यामुळे परिसरात  हळहळ व्यक्त होत आहे. वैभवच्या आत्महत्त्येचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनेची नोंद विटा पोलिस ठाण्यात झाली आहे. हवालदार आर. डी. अवघडे  पुढील तपास करीत आहेत.