Breaking News

कृषी विभाग हा शेतकर्‍यांचा विभाग ः विकास देशमुख

अहमदनगर, दि. 10 - कोरडवाहू शेती अभियानात लोहगावचा समावेश झाला आहे. कोरडवाहू विकास कार्यक्रमांतर्गत या गावासाठी 35 कोटी रुपयांचा निधी आजपर्यंत दिला ाहे. याही वर्षी निधी देमार आहे. गावातील सर्व शेतकरी एकत्र आल्यामुळेच गावचा विकास झाला आहे, असे प्रतिपादन कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी केले.
लोहगाव येथे कृषी सप्ताहांतर्गत जनजागृती कार्यक्रमप्रसंगी श्री. देशमुख यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. लोहगाव येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाला खोलीकरण व रुंदीकरण झालेल्या कामात साचलेल्या पाण्याचे जलपूजन कृषी आयुक्त विकास देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नेवासे मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, प्र. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बर्‍हाटे, उपविभागीय कृषी अधिकारी गोरक्षनाथ लोखंडे, सरपंच रवींद्र घाडगे, उपसरपंच भास्करराव जाधव, सचिन देसर्डा, गिरीश बिबवे, तालुका कृषी अधिकारी शिंदे आदींसह शेतकरी उपस्थित होते. पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, राज्यभरात 42 हजार गावांत हा सप्ताह राबविला जात आहे. अधिकारी व शेतकरी यांची नाळ जोडली गेली पाहिजे. यासाठी या सप्ताहाचे आयोजन केले आहे. अधिकारी व शेतकरी यांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. गावात शेतीचा विकास करायचा असेल, तर एकोपा मह्त्वाचा आहे. ज्या गावात भांडणे आहेत. त्या गावात विकास होत नाही, योजना राबविल्या जात नाही, असे ते म्हणाले. यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले की, कृषी सप्ताह राज्यभर राबविला जात आहे. शेतकर्‍यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचले पाहिजे. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना प्रोत्साहन मिळाले आहे. याच योजनेमुळे लोहगावचा विकास झाला आहे. जलयुक्त शिवार बरोर वृक्ष लागवड ही योजना आहे, ती सर्वानी राबवावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. प्रास्ताविकात प्र. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बर्‍हाटे यांनी कृषी योजनांची माहिती दिली.