Breaking News

रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदला;महापौर,उपमहापौरांचे रेल्वेप्रशासनाला निवेदन

परभणी/प्रतिनिधी, दि. 10 - लांबपल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्याची महापौर सौ.संगिताताई वडकर, उपमहापौर भगवान रावजी वाघमारे यांनी केली मागणी परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने रेल्वे स्टेशन येथे जनरल मॅनेजर साऊथ सेंटर सिकंद्राबाद यांची भेट महापौर सौ. संगिताताई वडकर, उपमाहापौर भगवान वाघमारे, राजेद्र वडकर यांनी घेतली. परभणी शहरातील रेल्वे संदर्भात समस्या मांडल्या. जनरल मॅनेजर यांना लेखी पत्र देण्यात आले. या पत्रामध्ये परभणी ते पुणे रेल्वे रात्री दहा वाजता निघते व पुणे येथे 10.30 वाजता पोहचते. परभणी जिल्ह्यातून 5 हजार विद्यार्थी व काही ग्रामीण भागातील व शहरी भागातील कामासाठी पुणे येथे स्थलांतरीत झाले आहेत. 
परभणी येथून ते आठ ते 15 दिवसांना ये जा करतात. सणासुदीच्या दिवशी दिवाळी, दसरा, ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त येतात. शहरातील ट्रॅव्हल्स त्या काळात दुपटीने भाडे आकारतात. यासाठी रेल्वे प्रशासनाने पुणे येथे जाण्यासाठी सायंकाळी 7 वाजता गाडी निघण्याची वेळ निश्‍चित करावी जेनेकरून पुणे यथे सकाळी 7 वाजता पोहचेल. शहरातील नागरीक, विद्यार्थी यांच्यासाठी सोयीस्कर होईल. तसेच परभणी ते मुंबईसाठी दिवसभरात तीन गाड्या आहेत. सकाळी 11.20 वाजता तपोवन एक्सप्रेस त्यानंतर सायंकाळी 6.20 वाजता नंदिग्राम एक्सप्रेस व 7.10 वाजता देवगीरी एक्सप्रेस आहे. ही देवगीरी एक्सप्रेस औरंगाबाद येथे रात्री 11 वाजता पोहचते. यापूर्वी देवगीरी एक्सप्रेस परभणी येथून 8 वाजता निघत होती. तीसुद्धा औरंगाबाद येथे रात्री 11 वाजता पोहचते सध्या देवगीरी एक्सप्रेस 7.00 वाजता निघते ते औरंगाबाद येथे रात्री 11 वाजता पोहचते. एक तासाचा वेळ धिम्यागतीने
गाडी जाते. त्याऐवजी देवगीरी एक्सप्रेस परभणी येथून रात्री 8 वाजता सुरू करावे. तसेच परभणी येथून मुंबई जाण्यासाठी सकाळी 11.20 ते सायंकाळी 620 एवढे अंतर या दोन गाड्यामध्ये आहे. मुंबई जाण्यासाठी दुपारी 2 वाजता गाडी सुरू करावी अशी मागणी महापौर सौ. संगिताताई वडकर, उपमहापौर भगवान वाघमारे यांनी केली. यावेळी स्थानिक रहिवासी रितेष जैन, नितीन इजाते, घुले आदी उपस्थित होते.