भिवंडी परिसरात विविध घटनेत दोघांचा बुडून मृत्यू
ठाणे, दि. 19 - भिवंडी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी दोघांचा बुडून मृत्यू झाला. शांतीनगर येथील तौसिफ शेख आणि ओवळी येथील अब्दुल कासीम अंसारी असे त्या बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
तौसिफ शेख हा भंगार वेचणारा युवक मित्रांसोबत चाविंद्रा हद्दीतील कामवारी नदीच्या कालापत्थर येथे अंघोळीसाठी गेला होता. अंघोळ करताना पाण्याच्या प्रवाहाचा त्याला अंदाज न आल्याने तो पाण्यात वाहून गेला. त्याच्या मित्रांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना बोलावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत त्याच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने बुडून मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळताच सहाय्यक निरीक्षक स्वपन बिश्वास यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने तौसिफचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.