जिल्हा परिषदेच्या लिपीक वर्गीय कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन
लातूर, दि. 19 - जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणार्या सर्व विभागातील लिपीक वर्गीय कर्मचारी वर्गाने 15 जुलैपासून राज्य सरकार विरोधात लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. लिपीक वर्गीय कर्मचार्यांचे गेड पे व अन्य मागण्या करीत हे आंदोलन महाराष्ट्र राज्य लिपीक वर्गीय संघटनेकडून करण्यात येत आहे.
या आंदोलना अंतर्गत जिल्हा परिषदेतील सर्व विभागाचे सर्व कर्मचारी कार्यालयात येत आहेत. हजेरी पटावर स्वाक्षर्या करीत आहेत. मात्र, जनतेची कुठलीच कामे करीत नाहीत. यामूळे जिल्हा परिषद लिपीक वर्गीय कर्मचारी वर्गाचे आंदोलन एका बाजूला यशस्वी होत आहे तर दुसर्या बाजूला जिल्हा परिषदेत विविध कामासाठी येणार्या जनतेची कामे होत नसल्याने नागरिक वैतागले आहेत.