Breaking News

महागाई रोखण्यात सरकारला अपयश : राहुल गांधी

नवी दिल्ली, दि. 29 - देशातील महागाई रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका काँग्रसचे उपाध्याक्ष राहूल गांधी यांनी गुरूवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी महागाई कमी करण्याचे आश्‍वासन दिल होते. मात्र मोदींना आपल्या आश्‍वासनांचा साफ विसर पडला असून, डाळीचे दर 200 रुपयांवर गेली आहे.
लोकसभेमध्ये बोलताना गांधी म्हणाले, ‘जो डाळ पिकवतो त्याला 50 रुपये व तीच डाळ बाजारात 180 रुपयाला विकली जाते. डाळी, भाज्या सर्व काही महागले  आहे, महागाई कमी करण्याचे आश्‍वासन कुठे गेले? ‘मा बच्चे रातभर रोते है, आसू पिकर सोते है,‘ हा मोदींचा डायलॉग होता, मग महागाईचे काय झाले? आम्ही  शेतकर्‍यांची 70 हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली, तुम्ही उद्योजकांचे कर्ज माफ केले. मोदी सरकारने उद्योजकांना मदत केली, मात्र शेतकरी, कामगारांना 1  रुपयाचीही मदत केली नाही. महागाईवरुन मोदींनी फक्त डायलॉगबाजी केली असेही ते म्हणाले. महागाईवरील भाषण संपताना राहूल गांधीनी मोदींच्या काळात  डाळींच्या किंमती कशा प्रकारे वाढल्या, यावर त्यांनी अरहर मोदी अरहर मोदी असा उपरोधिक टोला लगावला.