Breaking News

परिचारिकांच्या ‘डयुटी’वरून सेना-भाजपात ठिणगी

मुंबई- 11 - शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपाने महापालिकेत आपली कामगार संघटना स्थापन केली असली तरी ही संघटना मान्यताप्राप्त म्युनिसिपल कामगार  सेनेसाठी डोकेदुखी ठरत आहे. पालिका रुग्णालयांतील परिचारिकांच्या (नर्स) ‘डयुटी पॅटर्न’ बदलण्यावरून प्रशासनाने परस्पर निर्णय घेत मान्यताप्राप्त  शिवसेनाप्रणीत कामगार सेनेला बाजूला केले.
भाजपाप्रणीत हिंदुस्थान मजदूर संघटनेच्या पदाधिका-यांशी बोलूनच अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परिचारिकांना सलग दोन दिवस  रात्रपाळी केल्यांनतर मिळणा-या सुट्टीपासून मुकावे लागणार आहे. या निर्णयामुळे शिवसेनेचा चांगलाच तीळपापड झाला आहे.
मुंबईतील महापालिकेच्या केईएम, शीव व नायर या प्रमुख रुग्णालयांसह 17 उपनगरीय रुग्णालये व विशेष रुग्णालयांमधील परिचारिकांची सेवा ही पूर्वी 3  रुग्णांमागे एक अशाप्रकारची होती. परंतु आता 50 ते 60 रुग्णांमागे एकेक परिचारिकांना सेवा बजावावी लागत आहे. त्यामुळे या परिचारिकांवर कामाचा ताण येत  आहे.