Breaking News

कोयना धरणा 1 दिवसात 6 टीएमसी पाणी

पाटण, दि. 11 - कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरुच असून, गेल्या चोवीस तासांत धरण पातळीत 6 टीएमसीने वाढ झाली आहे. 
सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात सोमवारी पावसाचा जोर कायम आहे. या परिसरात 268 मिलीमीटर (एकूण 1592) पावसाची नोंद झाली आहे. धरणात 24  तासाच्या नोंदीनंतर आज सकाळी आठ वाजेपर्यंत 6 टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. धरणात एकूण 33.75 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. पावसामुळे  पर्यटकांना कोयना परिसराचे वेध लागले आहेत. त्यामुळे ओझर्डे धबधब्यावर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी झालेली पाहावयास मिळत आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली.