पवई तलावाचे मगरींचे उद्यान नामकरण करा
मुंबई, दि. 11 - पवई तलाव हा महापालिकेचा असला तरी या तलावातील पाणी हे सांडपाण्यामुळे प्रदूषितच असते. मात्र, या तलावात मासे मोठया प्रमाणात असल्यामुळे अनधिकृतरीत्या मासेमारीही अधिक प्रमाणात होत आहे. या तलावात मगरींची संख्या मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे पवई तलावात मासेमारीला बंदी घालून हा परिसर ‘मगरीचे उद्यान’ म्हणून घोषित करावा, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.
मुंबईचे नैसर्गिक वैभव असणा-या तलावांपैकी पवई तलाव हा एक आहे. परंतु या तलावांमध्ये आसपासच्या परिसरातील निवासी भागांमधून सांडपाणी सोडण्यात येते. तर काही वाहनचालक आपली वाहने या तलाव परिसरात धुतात.
मुंबईचे नैसर्गिक वैभव असणा-या तलावांपैकी पवई तलाव हा एक आहे. परंतु या तलावांमध्ये आसपासच्या परिसरातील निवासी भागांमधून सांडपाणी सोडण्यात येते. तर काही वाहनचालक आपली वाहने या तलाव परिसरात धुतात.