वाकडमध्ये संगणक अभियंत्याकडून डॉक्टर पत्नीची गोळी झाडून हत्या
पुणे, दि. 15 - वाकड येथे (बुधवारी) संध्याकाळच्या सुमारास एका संगणक अभियंत्याने बंदुकीतून गोळी झाडून पेशाने डॉक्टर असलेल्या पत्नीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर पळून जाणा-या आरोपी पतीला पोलिसांनी कात्रजजवळ अटक केली आहे. दरम्यान आरोपीने हा खून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी मयत डॉक्टरचे भाऊ अमर संतराम चंदवन (वय 32 रा. अनुदिप सोसायटी सर्व्हे नं.282 लोहगाव, पुणे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
अंजली मनोज पाटीदार (वय-34, रा. वाकडगांव) असे खून झालेल्या डॉ. पत्नीचे नाव असून मनोज पाटीदार असे खून करणार्या पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अंजली व आरोपी पती मनोज यांचा विवाह साधारण चार ते पाच वर्षांपूर्वी झाला. त्यानंतर या दोघांमध्ये काही छोट्या-छोट्या घरगुती कारणांवरुन वाद होत होते. तसेच आरोपी हा अंजली यांना घरखर्चासाठी आणि दोन वर्षाच्या मुलाला दुध आणण्यासाठी देखील पैसे देत नसल्याने त्यांच्यात वाद होत असे.
अंजली यांचे वाकड परिसरात मदर क्लिनिक नावाने क्लिनिक आहे. परंतु, क्लिनिक नवीन असल्याने ते चालत नव्हते. त्यामुळे अंजली यांचा भाऊ त्यांनी अधून मधून आर्थिक मदत करत होता. मात्र काल अंजली आणि त्यांच्या पतीमध्ये संध्याकाळी आठच्या सुमारास वाकड येथील क्लिनिकमध्ये कडाक्याचे भांडण झाले.त्यानंतर अंजली यांनी त्यांच्या वहिनीच्या मोबाईलवर फोन करुन फिर्यादी यांना सांगितले की, माझा पती मला गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मारहाण करत असून आत्ता देखील तो आपल्याला मारहाण करत आहे. हे ऐकल्यानंतर अंजली यांच्या भावाने त्यांना आपण याप्रकरणी पोलीसात तक्रार दाखल करू असे सांगितले. त्यानंतर अंजली यांनी आपण परत 10 मिनिटांनी फोन करते असे सांगितले. मात्र, काही वेळानंतर फिर्यादीच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने फोन करुन सांगितले की, डॉ. अंजली या त्यांच्या क्लिनीकमध्ये जखमी अवस्थेत पडल्या आहेत.
यानंतर तात्काळ अंजली यांच्या भावाने वाकड येथील क्लिनीकमध्ये धाव घेतली. मात्र तोपर्यंत डॉक्टर अंजली यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर फिर्यादी यांनी वाकड पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल केली. दरम्यान, चौकशीदरम्यान आरोपीचे मयत महिलेसोबतचे हे तिसरे लग्न असून यापूर्वीच्या दोन पत्नींचादेखील मृत्यू संशयास्पदरित्या झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वाकड पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक डी.आर.लोंढे हे करीत आहेत.