विविध उपक्रमांनी साजरे झाले 1 जुलै एक संकल्प अभियान
परभणी प्रतिनिधी, दि. 2 - 1 जुलै एक संकल्प या अभियानातुन राज्य सरकारने एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवड करण्यासाठी जिल्ह्याला दिलेले 3 लाख 15 हजार 299 वृक्षांची लागवड करण्याचे उद्दीष्ट जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय व सामाजिक संघटनांनी पुर्ण करून या अभियानास उस्फुर्त प्रतिसाद देत वृक्ष लागवडीचा संकल्प पुर्ण केला. जिल्ह्यातील 9 तालुक्यात या अभियानाची सुरूवात होवुन सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, नगर पालिका, औद्योगीक वसाहत, औद्योगीक न्यायालय, वनविभाग, आरोग्य विभाग, जल व्यवस्थापन,सामाजिक वणीकरन, बँक, विमा तसेच विविध सामाजिक संघटना व संस्थांनी जिल्ह्यातील वृक्ष लागवडीला उस्फुर्त प्रतिसाद देत पहाटे पासुनच आपल्या परिक्षेत्रात वृक्ष लागवडीला सुरूवात केली. परभणी तालुक्यात 32 हजार 740, जिंतुर 1 लाख 80 हजार 78, पाथरी 12 हजार 910, मानवत 12 हजार 617, सेलु 17 हजार 460, सोनपेठ 8 हजार 785, गंगाखेड 20 हजार 949, पालम 13 हजार 153, पुर्णा 16 हजार 535 वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट प्रशासनाने आधोरेखीत केले होते. हि संख्या पुर्ण करत संपुर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने वृक्ष लागवड करण्यात आली. जिल्ह्यातील वृक्ष लागवड मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जि.प.चे कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर, जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर, पोलिस अधिक्षक नियती ठाकर, मनपा आयुक्त राहुल रेखावार, महापौर संगीता वडकर, उपमहापौर भगवान वाघमारे, विभागीय कृषी अधिकारी दिवेकर, वन विभागाचे राठोड, परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक ंश्रीकांत गबणे, सामाजिक वनीकरणचे एस.एन.देशपांडे आदिसह जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधीनी हि मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला.