जीवनावश्यक वस्तू, डाळींची साठेबाजी करणार्यांवर कडक कारवाई- शिवाजी जोंधळे
जालना, दि. 17 - जिल्ह्यातील डाळींचे आयातदार, घाऊक व किरकोळ व्यापारी यांनी डाळी तसेच जीवनावश्यक वस्तुंचा साठा आणि विक्री करताना त्यामध्ये पारदर्शकता ठेवावी. जीवनावश्यक वस्तू विशेषत: डाळींची साठेबाजी आणि जादा भावाने विक्री करणार्यांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहामध्ये सर्व डाळींचे आयातदार, घाऊक व किरकोळ व्यापारी यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी डी.एन. भारस्कर, नायब तहसीलदार गणेश पोलास आदी उपस्थित होते.