केशेगाव येथे बळीराजा चेतना अभियानांतर्गत पथनाट्याद्वारे प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन
उस्मानाबाद, दि. 17 - जिल्हा माहिती कार्यालय आणि महसूल प्रशासनाच्या वतीने दुष्काळगस्त शेतकर्यांचे मनोबल वाढवून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी बळीराजा चेतना अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
या अभियानांतर्गत केशेगाव येथे शनिवारी पथनाटय कार्यक्रमाचे उद्घाटन केशेगाव येथील तलाठी अमर पडवळ यांच्या हस्ते झाले.या पथनाट्य कार्यक्रमास केशेगावचे सरपंच श्रीमती पुष्पा गवळी, उपसरपंच महादेव कोळगे, तंटामुक्त गाव मोहिमेचे अध्यक्ष भारत पाटील व जिल्हा माहिती कार्यालयातील श्रीमती आशा बंडगर यांची प्रमुख उपस्थिती होती.