अमरनाथ यात्रा सलग दुसर्या दिवशी स्थगित
श्रीनगर, दि. 10 - ‘हिज्बुल मुजाहिदीन‘ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या बुर्हाण वणी चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीर खोर्यात आजही (सोमवार) हिंसाचाराच्या घटना सुरु असल्याने संचारबंदी कायम आहे. यामुळे आज सलग दुसर्या दिवशी अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
कुलगाम, अनंतनाग, त्राल, कोकेरनाग आणि श्रीनगरमधील सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. शनिवारी जवान व संतप्त जमावामध्ये झालेल्या धुमश्चक्रीत 12 जण ठार, तर 50 जण जखमी झाले आहेत. आंदोलकांनी तीन पोलिस स्थानकांसह पाच इमारतींना व वाहनांना आग लावली. फुटीरतावादी नेत्यांनी शनिवारी बंद‘ पुकारला होता.