खडकवासलांत 28 टक्के पाणीसाठा
पुणे, दि. 10 - खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मागील वर्षी पेक्षा सुमारे एक टीएमसीने जास्त पाणीसाठा जमा झाला आहे. तसेच मागील 24 तासात देखील एक टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे, अशी माहिती खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी दिली.
मागील वर्षी चारही धरणात मिळून 10 जुलै रोजी 7.24 टीएमसी म्हणजे 24.85 टक्के पाणीसाठा जमा होता. रविवारी सकाळी चारही धरणात 8.19 टीएमसी म्हणजे 28.10 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सुमारे 0.95 टीएमसी म्हणजे 1 टीएमसीने वाढ आहे. तर काल सकाळी चारही धरणात 7.10 टीएमसी पाणीसाठा होता. गेल्या 24 तासात 1.09 टीएमसीने वाढ झाली आहे.