Breaking News

अज्ञात वाहनाची काळवीटाला धडक

माजलगाव, दि. 09 -  महामार्ग क्र, 222 व सावरगावच्या अलीकडील पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाची काळवीटाला जबर धडक बसल्याने तोंडाला व पायाला जबर मार लागल्याने उपचारा अभावी मत्यू पावल्याची घटना दि.05 रोजी दुपारी 12 वाजनेच्या दरम्यान घडली.
सावरगाव शिवारात व महामार्ग क्र, 222 च्या लगत वन्य प्राण्यांचा वावर आहे.यामधे लांडगा, कोल्हे, तरस, काळवीट, हरिण, आदी प्राणी या भागातील शेतात फिरताना दिसतात.मागच्या आठवड्यात झालेल्या पावसाने कुठं बुठ हिरवे गवत प्राण्यांना चरन्या जोगे झाल्याने परिसरात वन्य प्राणी चरण्यास येतात,असेच काळवीट चरण्यास या परिसरातून जात असताना अज्ञात वाहनाची जबर धडक बसल्याने ते काळवीट गंभीर जखमी झाले होते.या परिसरातील नागरिकांना कळल्यास त्यानी या काळवीटाचे प्राण वाचविण्यासाठी बरेच प्रयत्न केले.