कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाचे दुसरे केंद्र सुरू
नवी दिल्ली, दि. 14 - तामिळनाडूतील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील दुसरा रिअॅक्टरही आण्विक ऊर्जा तयार करण्यास (क्रिटिकल) सज्ज झाला आहे. रविवारी रात्री 8.56 वा. दुस-या रिअॅक्टरला असे ऊर्जानिर्मिती क्षम बनवण्यात यश आले. तेव्हा कर्मचारी, तंत्रज्ञांचे पथक आणि रशियन विशेष गटाच्या सदस्यांनी जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात जल्लोष साजरा केला.
ज्या दिवशी रिअॅक्टर क्रिटिकल होतो, तेव्हापासून 45 दिवसांनी प्रत्यक्ष अणुऊर्जा तयार होते. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचीही उभारणी कुडानकुलम प्रकल्प यशस्वी करणा-या एनपीसीआयएलकडे सोपवण्यात आली आहे. कुडानकुलम प्रकल्पाला यशस्वी सुरुवात झाल्यामुळे जैतापूर प्रकल्पाला अकारण विरोध करणा-या आडमुठयांना ही सणसणीत चपराक बसली आहे.