कोल्हापूरात पाऊसाचे थैमान
कोल्हापूर, दि. 14 - सलग पाचव्या दिवशीही कोल्हापुरात मुसळधार पाऊस पडत असल्याने येथील पंचगंगा नदीला पूर आला आहे. सर्वाधिक पाऊस गगडबावडा तालुक्यात झाला असून; येथील टेकवाडी, तर करवीर तालुक्यातील चिखली, हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी या गावांना पुराचा वेढा पडला आहे. त्यामुळे ‘एनडीआरएफ’ची फौज नागरिकांच्या मदतीला तैनात करण्यात आली आहे.
पुरामुळे येथील 50हून अधिक गावांचा संपर्क तुटला असल्याने एनडीआरएफला मदत करण्यात अडथळे येत आहेत. त्यात रेडे डोह फुटल्याने पूरस्थिती गंभीर झाली असून; पुरात वाहून गेलेल्या चार व्यक्तींपैकी दोघे सुदैवाने बचावले आहेत. दरम्यान, राधानगरी धरण 80 टक्के भरल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.