ओला, उबेर टॅक्सीच्या मनमानीला बसणार चाप
मुंबई, दि. 23 - ओला, उबेर या खासगी टॅक्सींवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन धोरण अमलात आणणार आहे. मोबाईल अॅपच्या माध्यमातून सेवा देणा-या टॅक्सी कंपन्यांसाठी परिवहन विभागाने नियमावली तयार केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवली आहे. मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर ही नियमावली लागू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात बनावट रिक्षा परवान्यांचे रॅकेट उघडकीस आले आहे. तसेच मुंबई शहरात ओला व उबेर यांसारख्या खासगी टॅक्सीचालकांनी धुमाकूळ घातला आहे. खासगी कंपन्यांच्या टॅक्सींना केवळ पर्यटन वाहतुकीची परवानगी आहे. तरीही या टॅक्सी किलोमीटरच्या दरात भाडे आकारत आहे.