Breaking News

प्रज्ञाशोध परीक्षेत उज्वल यश संपादन केल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार

लासलगाव/प्रतिनिधी। 14 - निफाड तालुक्यातील नांदगाव जि.प.प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेने मंथन पब्लिकेशन प्रज्ञाशोध परिक्षेत उज्ज्वल यश संपादन केले.दुसरीतील अमेय राऊलवार, तिसरीतील महेश नवले, अथर्व नवले, व अभिषेक वाघ या चौघांनी गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळविला, त्यांना देविदास शिंदे, प्रशांत तुपे, श्रीनिवास राऊलवार यांचे मार्गदर्शन लाभले, या यशाबद्दल पारितोषिक वितरण समारंभात धुळ्याचे आयुक्त भोंगळे साहेब, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, प्राचार्य डॉ.भाऊसाहेब गेम,डॉ.सुरेश कांबळे, केंद्रप्रमुख व पदवीधर संघटनेचे अध्यक्ष पुंडलिक अनारसे,कुणाल दराने व मंथन समन्वयक तेजस राऊत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, विस्तार अधिकारी एस्. डी.थोरात, केंद्रप्रमुख आर.ए.निकम, मुख्याध्यापक पुंडलिक अनारसे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास निकम, सरपंच मनिषा निकम, सदस्य बाळासाहेब निकम, भास्कर निकम, सोमनाथ निकम, कृष्णा वाघ, तुकाराम निकम, जनार्दन निकम आदिंनी अभिनंदन केले आहे.