Breaking News

मंत्रालयवर आंबेडकरी जनतेचा निषेध हल्लाबोल मोर्चा

परभणी / प्रतिनिधी, दि. 14 -  हुकुमशाही पध्दतीने जातियवादी सत्ताधार्‍यांची मदत घेवून आंबेडकर भवन व बुध्दभुषण प्रिटींग प्रेस उध्वस्त केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या वतीने मंत्रालयावर निषेध हल्लाबोल मोर्चा चे आयोजन दिनांक 19 जुलै 2016 रोजी सकाळी 11.00 वा. मुंबई येथभल राणीबाग मैदान भायखळा  येथुन ते विधान भवन मुंबई येथे करण्यात आले आहे.   या  मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा. असे आवाहन रिपब्लीकन सेनेचे तथा लोकनेते  विजयराव गायकवाड (बाबा) यांनी केले आहे. षड होवून थंड राहण्यापेक्षा अन्याविरुध्द बंड करुन गुंड झालेले बरे...! यासाठी भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खा. अ‍ॅड. प्रकाश  उर्फ बाळासाहेब आंबेडकर, रिपब्लीकन सेनेचे सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर यांच्या खंबीर नेतृत्वात जातीयवादी हुकमशाही प्रवृत्तीच्या सरकार विरोधात या आंदोनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात आंबेडकरी जनतेने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा व आपली ताकद सरकार दाखवुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहभवनास पाडणार्‍यांना धड शिकवावा असे आवाहन भारिप जिल्हाध्यक्ष यशवंतभैय्या भालेराव यांनीही केले आहे. या आंदोलनात आंबेडकर भवन उध्वस्त करणार्‍या गद्दार रत्नाकर गायकवाड व तोतया ट्रस्टीच्या पदाधिकार्‍यांना त्वरीत अटक करुन कडक कार्यवाही करा, राज्यात अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट कायद्याची कडक अंमलबजावणी कगरा, गेल्या अनेक वर्षापासुन वहीतीमध्ये असेले गायरानाचे पट्टे नावाने करुन 7/12 चे वाटप करा, परभणी जिल्ह्यातील आंबेडकर जयंती दरम्यान दाखल करण्यात आलेले सर्व खोटे गुन्हे परत घ्या., मनरेगा योजनेतील परभणी जिल्ह्यातील भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी अंती दोषी असलेल्या सर्व संबधीतांवर गुन्हे दाखल करा., वनखात्याच्या जमीनीवर 1980 पासून असलेले अतिक्रमणे नियमीत करुन मालकी पत्र देण्यात यावे, सर्व गरीबांची नावे बीपीएल च्या यादीत समाविष्ट करण्यात यावे. आदी मागण्यांसाठी मंत्रालयावर हल्लाबोल करण्यात येणार आहे.