Breaking News

राष्ट्रवादी युवती काँग्रेस युवतींच्या प्रश्‍नांसाठी होणार आक्रमक - प्रेरणा बलकवडे यांची ग्वाही

नाशिक/प्रतिनिधी। 14 - राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्ष मा. खा. सुप्रियाताई सुळे यांनी विविध नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये युवतींना जास्तीत जास्त उमेद्वार्या देण्यात येतील  असे सांगितल्याची माहिती राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाप्रमुख प्रेरणा बलकवडे यांनी राष्ट्रवादी भवन, नशिक येथे बैठक झाली त्यात दिली.
राष्ट्रवादी भवन, नशिक येथे युवतींच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाप्रमुख प्रेरणा बलकवडे यांनी घेतली होती. नशिक जिल्ह्यात युवतींचे विविध प्रश्‍न खून, छेडछाड, अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात युवतींची सुरक्षा व त्यांचे भवितव्य या बाबत युवती संघटनेमार्फत पूर्ण पाठींबा देण्यात येईल व वेळेप्रसंगी आक्रमक होऊन रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी ते करू असे सौ प्रेरणाताई बलकवडे बोल्या. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांनी महिलांना 50% आरक्षण दिले त्याचा लाभ आपले पुढील राजकीय व सामाजिक भवितव्य ठरविण्यासाठी युवतींनी  करू
न घ्यावा असे सांगण्यात आले. युवतींच्या कामामध्ये पक्षामार्फत योग्य ते सहकार्य करण्याचे आश्‍वासन नशिक राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र पगार यांनी दिले. युवतींनी विविध समस्या मांडून त्यावर चर्चा केली.
या प्रसंगी राष्टवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाअध्यक्ष रविंद्र पगार, उपजिल्हाध्यक्ष नारायण हिरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, कोमल साळवे, सायली सोनावणे, सानिया कुडचिकर, प्रतिक्षा जाधव, पद्मा पवार, मंगल नागरे, सुवर्णा गांगुर्डे, यशश्री जोशी, प्रतिक्षा बिल्लाडे, वर्षा साळवे आदि उपस्थित होते.