पालकमंत्रीपदासाठी हालचालींना वेग
अहमदनगर, दि. 15 - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 18 जून रोजी सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी करुत राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार तातडीने करण्यात आला. यामध्ये कोणी नाराज झाले असले तरी त्याचा विचार न करता मुख्यमंत्री तसेच अनेक मंत्री दौर्यावर असल्याने या मंत्रीमंडळ निवडीबद्दल जास्त आगड - पाखड झाली नाही. मात्र, मुख्यमंत्री तसेच इतर मंत्री दौर्यावरुन येत नाही तोपर्यंत अधिवेशन सुरु होत असल्याने निवडी बाबत चर्चा होणार नाही असेच काहीसे गणित समोर ठेवण्यात आले आहे. तसेच आता मंत्रीमंडळ निवडीनंतर पालकमंत्री निवडीतही मोठे बदल होणार असल्याची चर्चा आहे.
राज्यामध्ये सध्या युतीची सत्ता असल्याने तसेच लवकर येवू घातलेल्या नगरपालिका निवडणुका तसेच जिल्हा परिषद तसेच पदवीधर मतदार संघात निवडणूका होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालमंत्री बदलाच्या हलचालींना वेग आला आहे. तसेच काही ठिकाणी दोन दोन जिल्हयांना मिळून एकच पालकमंत्री असल्याने लवकरच यामध्ये बदल होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.
सध्या राजकीय वर्तृळात महादेव जानकर (अहमदनगर), भाऊसाहेब फुंडकर (बुलढाणा), सदाभाऊ खोत (सांगली), संभाजी निलंगेकर (लातूर), सुभाष देशमूख (उस्मानाबाद), तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडेही दोन जिल्हयाचे पालकमंत्री बदाची जबाबदारी आहे. यामध्ये बीड व लातूर असे दोन जिल्हे आहेत. यामध्ये सध्या त्या नाराज असल्याची चर्चा असल्याने तुर्ततरी मुख्यमंत्री मुंडे यांच्या जिल्हयात काही बदल करणार नसल्याचे चित्र दिसत असून बीडच्या पालकमंत्री मुंडे यांच्याकडे ठेवून लातूरची जबाबदारी संभाजी निलंगेकर यांच्याकडे सोपविली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अहमदनगर जिल्हयात भाजपची ताकद वाढविण्यासाठी पालमकंत्रीपदाच्या हालचालींना वेग आला असल्याचे चित्र दिसत आहे. यामधुन पुन्हा एकदा जिल्हयातच नाही तर राज्यात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीत वादाची ठिनगी पडण्याची शक्यता आहे. सध्याच्या परस्थितीत राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्काना उत आला असुन सध्या महादेव जानकर यांच्या रुपाने नविन पालकमंत्री भेटणार की पुन्हा राम शिंदे अशी चर्चा सुरु आहे.