विठ्ठल-रुख्मीणी व संतांच्या वेशभूषेने दिंडीत रंगत
अहमदनगर, दि. 15 - विठ्ठल... विठ्ठल... असा टाळांच्या निनादात गजर करीत पालखी सोहळा बुर्हाणनगर परिसरात आला. या विठ्ठल-रुख्मीणी व संतांची ची वेषभुषा केलेले विद्यार्थी पालखीसोबत चोपदार, विणेकरी, टाळकरी, भालदार, अंबारी, पताका, घोडे अशा अनोखे दिंडीने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत दिंडीचे दर्शन घेतले.
ही पालखी पंढरपुरला चालली नव्हती तर बुर्हाणनगर येथील संकल्प अॅकॅडमी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हुबेहुब काढलेली ती पालखी होती. पालखी सोहळ्याचा आनंद अनुभवण्यास मिळावा म्हणून संकल्प अॅकॅडमी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वारकरी बनून हा सोहळा साकारला. ग्रामस्थांनी अनोक्या पालखी सोहळ्याचे तोंडभरुन कौतुकही केले. विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी
, म्हणून या संस्थेच्या संचालिका सौ.निलांगी गडाख यांच्या मार्गदर्शनाखा या पालखी सोहळ्याचे आयोजन शाळेच्यावतीने करण्यात आले होते. या पालखी सोबत सर्व विद्यार्थी वारकर्यांच्या वेशभुषेत होते. तसेच डोक्यावर तुळस घेवून रांगेमध्ये विद्यार्थीनी साडीच्या वेशभुषेत हरिनामाचा गरज करीत चालल्या होत्या. वाकरी नाचत भजन गात होते. खांद्यावर माऊलीची पालखी घेऊन बालवारकरी भजन गात होते. टाळ-मृदृंगाचा आवाज व हरिनामाचा गजर यामुळे बुर्हाणनगर परिसरातील वातावरण धार्मिक बनले होते. पावसाची संततधार सुरु झाल्याने बाल वारकर्यांच्या आनंदाला उधान आले होते.
हा अनोखा पालखी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या नंदा ताटे व त्यांच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले. संकल्प अॅकॅडमी ही शाळा मुळा एज्युकेशन सोसायटी, सोनर्इृ यांची शैक्षणिक क्षेत्रातील आणखी एक पाऊल आहे.