रिपब्लिकनचे मनपासमोर निदर्शने
अहमदनगर (प्रतिनिधी) । 15 - गौतमनगर, ढोरवस्तीमधील गटार, ड्रेनेजलाइन, स्वच्छतागृह दुरुस्तीबाबत तसेच पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे महापालिकेतर्फे निदर्शने करण्यात आली. या मूलभूत प्रश्नांसंदर्भात महापालिकेने गेल्या तीन वर्षांपासून चालढकल केली आहे. येत्या 48 तासांमध्ये या समस्या मार्गी लावल्या नाहीतर धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला.
वरील वस्त्यांमधील नागरिकांची लोकसंख्या 2500 असून येथील महिला शौचालयांची संख्या फक्त चार आहे. त्यात ही शौचालयांची नादुरुस्ती मोठयाप्रमाणात झाली आहे. ड्रेनेज नसल्यामुळे शौचालयामधील मैला रस्त्यावर व वस्तीमध्ये येत असून, येथील नागरिकांना व येणार्या जाणार्यांना त्रास होत आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांचे विशेष करून मुलांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. शौचालयांची साफसफाई वेळच्यावेळी होत नसल्याने घाणीचे साम्राज्य आहे. महिलांना उघड्यावर शौचास बसतात. याबाबतची तक्रारी व निवेदन देऊन देखील महापालिकेकडून कार्यवाही झालेली नाही.
दरम्यान, दिल्ली दरवाजा ते लालटाकी रस्त्यावर अनेक खड्डे पडले आ
हेत. याच रस्त्यावर महाविद्यालये आहेत. पावसाचे पाणी देखील येथेच येऊन साचते. त्यामुळे रस्त्यांवर वारंवार खड्डे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून अपघातांची मालिकाच येथे सुरू झाली आहे. खड्डयांमुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण देखील वाढले आहेत. त्याचप्रमाणे बालिकाश्रम रोडवरील रस्ता रुंदीकरणामध्ये विस्थापित झालेल्या कुटुंबांचे पुर्नवसन नाही. काटवन खंडोबा येथील घरकुलधारकांना पाण्याचे कनेक्शन नाही.
सर्व मुलभूत प्रश्नांसंदर्भात वारवांर निवेदने देण्यात आली आहे. पण त्यावर कार्यवाही झालेली नाही. आता आश्वासन नको. मागण्या त्वरीत मार्गी न लागल्यास आणि पुढील 48 तासांमध्ये कार्यवाही न झाल्यास महापालिकेसमोर धरणे आंदोलन किंवा आयुक्तांना घेरावा घालण्याचा इशारा रिपब्लिकन पक्षाने दिलेल्या निवेदनात दिला आहे. अजय साळवे यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष विजय भांबळे, सुरेश वाघचौरे, भाऊ साळवे, लक्ष्मण संभागळे, चंद्रकांत भिंगारदिवे, अविनाश शिंदे, सुजित घंगाळे, गणेश साळवे, विनोद साळवे, जितेंद्र कांबळे, मंगला शिंदे,अनुसया भाकरे, नीता साठे, आनंद सूर्यवंशी, राजेंद्र जाधव आदी आंदोलनांमध्ये सहभागी झाले होते.