शिक्षकांच्या निवडश्रेणीसाठी एम. ए. एज्युकेशन ग्राह्य
मुंबई, दि. 17 - राज्यातील खासगी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या निवडश्रेणीसाठी एम. ए. एज्युकेशन ही पदवी आता ग्राह्य धरली जाणार आहे. याचा फायदा राज्यातील हजारो शिक्षकांना होणार आहे. यासाठी मागील नऊ वर्षापासून शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये काम करणा-या शिक्षकांना त्रिस्तरीय वेतनश्रेणी लागू असून 12 वर्षानंतर वरिष्ठ वेतनश्रेणी व 24 वर्षानंतर निवडश्रेणी दिली जाते. 24 वर्षानंतर मिळणा-या निवडश्रेणीसाठी सरकारने काही अटी घातल्या होत्या. त्यामध्ये शै
क्षणिक पात्रता वाढवणे बंधनकारक केले होते.
या पार्श्वभूमीवर पदवी नसलेल्या शिक्षकांनी पदवीधर व पदवीधर शिक्षकांना पदव्युत्तर पदवी प्राप्त करणे आवश्यक होते. यात असंख्य शिक्षकांना नियमित उपस्थिती आवश्यक असलेला पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करता येत नाही. तर बीएस्सी झालेल्या शिक्षकांना एम. एस्सी पदवी प्राप्त करता येत नसल्याने हजारो शिक्षक निवडश्रेणीपासून वंचित राहत होते.