इपीएफ आता ऑनलाईन काढता येणार
नवी दिल्ली, दि. 17 - कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम काढण्यासाठी कर्मचा-यांना प्रचंड आटापिटा करावा लागतो. जुन्या कंपनीच्या कार्यालयात हेलपाटे मारून अर्ज भरून द्यावा लागतो. तो अर्ज कंपनी पीएफ कार्यालयाकडे पाठवते. त्यानंतर मग कधी रक्कम येईल, ते सांगता येत नाही.
आता या दिव्यातून देशभरातील कोटयवधी कर्मचा-यांची सुटका होणार आहे. येत्या ऑक्टोबरपासून इपीएफची रक्कम ऑनलाईन काढता येणार आहे. इपीएफओ त्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करत आहे. त्यामुळे इपीएफच्या कोटयवधी ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.
सध्या देशात 3 कोटी 60 लाख कर्मचारी इपीएफचे खातेधारक आहेत. ऑक्टोबरपासून हे कर्मचारी इपीएफची रक्कम काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतील. त्यासाठी एक स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार केले जात आहे. त्याची चाचणी अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती इपीएफचे सेंट्रल प्रॉव्हिडंट फंडचे आयुक्त डॉ. व्ही. पी. जॉय यांनी दिली.