मोहम्मद अली रोडवरील दुकानांवर कारवाई
मुंबई, दि. 17 - मुंबईतील फेरीवाल्यांवर कारवाई केल्यानंतर ‘हिंमत असेल तर मोहम्मद अली रोडवरील फेरीवाल्यांना उठवून दाखवा! त्यांच्यावर कारवाई करून दाखवा!’ असे आव्हान फेरीवाल्यांच्या संघटनांकडून महापालिका प्रशासनाला केले जायचे.
परंतु हे आव्हान आता महापालिका प्रशासनाने स्वीकारले असून मुस्लीम बहुल वस्ती असलेल्या आणि संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणा-या मोहम्मद अली
रोडवरील फेरीवाल्यांवर महापालिकेने कारवाई करून दाखवली.
जे. जे. पुलाखालील रस्त्यांसह पदपथ आणि बेस्टचे थांबे अडवून बसणा-या फेरीवाल्यांवर महापालिकेने कारवाई केली. महापालिकेने पदपथ अडवून बांधलेल्या तब्बल 25 दुकानांवर कारवाई करून यापुढे कोणाचीही गय करणार नाही हे स्पष्ट केले आहे.