Breaking News

भाजप सोडणार नाही : नवज्योत कौर सिद्धू

चंदीगड, दि. 19 - भाजपला सोडचिठ्ठल दिलेले भाजपपचे राज्यसभा खासदार व माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिंद्धू यांच्या पत्नी मात्र भाजप सोडणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.  सिद्धू यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देऊन पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पण मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकलेले नाही. मी भाजपमध्येच रहाणार आहे असे नवज्योत कौर सिद्धूने स्पष्ट केले.
 नवज्योत कौर सिद्धू पंजाब विधानसभेमध्ये भाजपच्या आमदार आहेत. तसेच त्या कॅबिनेट मंत्री देखील आहेत. मी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. मी माझ्या मतदारसंघामध्ये काम करत आहे असे नवज्योत कौर सिद्धू यांनी सांगितले.