तीन महिन्यांत पंधरा कोटी तीस लाख रुपयांची डागडुजी
पुणे, दि. 17 - वर्दळीच्या रस्त्यांवर खड्डे नसल्याचा दावा करणार्या महापालिका प्रशासनाने अवघ्या तीन महिन्यांत रस्त्यांच्या डागडुजीवर तब्बल पंधरा कोटी रुपये खर्च केला आहे. पावसाच्या तोंडावर ही कामे केल्यानेच कोट्यवधी रुपये अक्षरशः खड्ड्यात‘ गेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा परिणाम म्हणजे रस्त्यांवर जागोजागी खड्डे आणि पाण्याची डबकी दिसत आहेत. अशा कामांची ठेकेदाराकडून हमी घेतली असली तरी त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
शहरात गेल्या तीन महिन्यांत म्हणजे एप्रिल, मे आणि जूनमध्ये तब्बल अडीच लाख चौरस मीटर रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे. ही कामे होऊन महिनाभराचाही अवधी झाला नसताना त्यातील निम्म्याहून अधिक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. एवढेच नव्हे तर आता पुन्हा याच रस्त्यांवर जागोजागी डांबर टाकून, त्याच्या दुरुस्तीची तत्परता‘ ही महापालिका प्रशासन दाखवत आहे. त्यामुळे या कामांसाठी आता पुन्हा कोट्यवधी रुपये खर्च करण्याची व्यवस्थाच महापालिका प्रशासन करीत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
शहरातील सुमारे 2 लाख 50 हजार चौरस मीटर रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे महापालिकेने केलेल्या पाहणीतून आढळून आले होते. पावसाळा तोंडावर असतानाही कोट्यवधी रुपयांची कामे खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून कोणताही विलंब न लावता हाती घेतली.
यातही मे आणि जूनमध्ये सर्वाधिक कामे करण्यात आली. पहिल्या-दुसर्या पावसातच या रस्त्यांवरील डांबर वाहून गेल्याचे दिसून आले. डागडुजीची कामे असल्याने हमीची गरज नसल्याचे सांगत ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे धाडसही महापालिका प्रशासनाने दाखविले. त्यामुळे रस्त्यांच्या दुरवस्थेला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत म्हणाले, ‘ज्या रस्त्यांवर खड्डे होते. ते बुजविण्यात आले आहेत, तर काही रस्त्यांवर डांबराचा थर टाकण्यात आला आहे. या रस्त्यांची कामे आवश्यक असल्यानेच ती करण्यात आली आहेत.